Share

जय श्रीराम : …अखेर वीज कंपनीने दिले ‘शट डाऊन’ न करण्याचे आश्वासन

Published On: 

नागपूर-भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षणांपैकी एक दिवस म्हणजे आजचा राम मंदिर भूमीपूजनाचा दिवस! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागल्यानंतर राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्याच्या सुरुवातीबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी राम मंदिर निर्माण ट्रस्टने पंतप्रधान कार्यालयाच्या तारखेनुसार ५ ऑगस्ट म्हणजे आजचा दिवस ठरवण्यात आला.

काही क्षणांची प्रतिक्षा आता फक्त उरली असून अयोध्येत आता उत्साह शिगेला पोहोचला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहुर्तावर चांदीच्या फावड्याने हे भूमीपूजन करणार आहेत.एका बाजूला हे सर्व होत असताना  महाराष्ट्र वीज वितरण कंपनी तर्फे बुधवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत करण्यात येणारा ‘शट डाऊन’ अखेर मागे घेण्यात आला आहे.

बुधवारी ५ ऑगस्ट रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात येणार आहे. असे असताना वीज वितरण कंपनीने उद्या (ता. ५) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ‘शट डाऊन’चा संदेश ग्राहकांच्या मोबाईलवर पाठविला.

ग्राहकांनी याची दखल घेत थेट महापौर संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केली. महापौरांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना ही बाब लक्षात आणून दिली. कार्यकारी अभियंत्यांनी पत्राचे गांभीर्य लक्षात घेत ‘शट डाऊन’ चा निर्णय रद्द करीत असल्याचे महापौरांना कळविले.

या निर्णयामुळे नागपूरकर राम मंदिर भूमिपूजन सोहळा वाहिन्यांवरून अनुभवू शकेल, याबद्दल नागपूरकर जनतेने महापौर संदीप जोशी आणि वीज वितरण कंपनीचे आभार मानले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

भूमिपूजनाच्या दिवशीही टीका-टिपण्णी सुरूच,श्रेयवादाच्या मुद्द्यावरून सामनातून भाजपवर टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!