सिंधुदुर्ग: देशभरात कोरोनाने थैमान घातले असून सर्वसामान्य ते अनेक सेलिब्रेटी,राजकीय नेते हे देखील या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा ते राज्यातील आजी-माजी अशा अनेक राजकारणी व्यक्तिमत्वांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
आता, राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात चर्चेत राहिलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील कोरोना चाचणी केल्याचे ट्विटर मार्फत सांगितले असून अहवाल निगेटिव्ह आल्याने काळजीचे कारण नसल्याचे निष्पन्न झाले आहे. “काही दिवसापूर्वी माझ्या संपर्कात आलेला माझा सहकारी कोरोना बाधित झाला होता.. त्यामुळे मी काही दिवस विलगीकरणात होतो.. माझी काल कोविड टेस्ट झाली.. आपाल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे..आपले आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.”, असे ट्विट करत त्यांनी हि माहिती दिली.
जय श्रीराम : …अखेर वीज कंपनीने दिले ‘शट डाऊन’ न करण्याचे आश्वासन
काही दिवसापूर्वी माझ्या संपर्कात आलेला माझा सहकारी कोरोना बाधित झाला होता.. त्यामुळे मी काही दिवस विलगीकरणात होतो.. माझी काल कोविड टेस्ट झाली.. आपाल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे..आपले आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.
— Uday Samant (@samant_uday) August 5, 2020
उदय सामंत हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री देखील आहेत. तर, याआधी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक आमदारांना देखील कोरोना झाला होता. यातून लढा देत त्यांनी आपल्या कामकाजाला देखील सुरुवात केली. तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना १६ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. संघर्षमयी जीवनाच्या शेवटी देखील दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली होती. मात्र, आज रात्री २ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
अनिलभैय्या आता आपल्यात नाहीत हे ऐकून धक्का बसला – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

