Share

“राहुल गांधींचे विधान म्हणजे नीच टूलकिटच्या पुढच्या प्रवृत्तीच्या आंदोलनाची प्रस्तावना तर नव्हे?”

Published On: 

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी(३ फेब्रु.) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेला सुरुवात केली. यावेळी बोलत असतांना राहुल यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच संविधानात भारताला राष्ट्र म्हटलेले नाही, भारत हा राज्यांचा संघ आहे. सरकारला इतिहासाचे ज्ञान नाही. संवादाशिवाय तुम्ही लोकांवर राज्य करू शकत नाही. प्रत्येक राज्याची स्वतःची संस्कृती, भाषा आणि इतिहास असतो. केंद्र राज्यांवर कोणताही दबाव आणू शकत नाही, असेही राहुल म्हणाले. दरम्यान, राहुल यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राज्यघटनेत भारताला राष्ट्र म्हटलेलं नाही हे घातकी विधान म्हणजे नीच टूलकिटच्या पुढच्या प्रवृत्तीच्या आंदोलनाची प्रस्तावना तर नव्हे?’, असा सवाल भातखळकरांनी केला आहे. तसेच भारत वर्ष हे एक सनातन राष्ट्र आहे या सिद्धांतावर भारताची १३० कोटी जनता दृढ आहे हे राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावे, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मोदी सरकारने उद्योग क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण केली आहे. कोरोना काळात जसं कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट आले तसा दोन उद्योगपतींचा व्हेरियंट आला आहे आणि त्यांच्या हातात देशातील सर्व उद्योग देण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. एका व्यक्तीकडे खनिजं, तेल, वीज असं जे काही आहे नाही ते दिलं तर दुसऱ्या व्यक्तीकडे पेट्रोकेमिकल, ई-कॉमर्स, टेलिकॉम असे उद्योग दुसऱ्याकडे देण्यात आले. हे दोन उद्योगपती म्हणजे अदानी आणि अंबानी आहेत, असेही राहुल यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!