🕒 1 min read
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख(former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप करत खळबळ माजवली आहे. यावरच परमबीर सिंह एक आरोपी असून त्यांच्यावर खंडणी, गुन्हे अपहरणापर्यंत असे अनेक आरोप असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता अतुल भातखळकरांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे आरोप, स्वत:च्या बचावासाठी आरोपी इतरांची नाव घेतो असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे.
अर्णव गोस्वामीला घरातून उचलून आणताना परमबीर सिंह गळ्यातले ताईत होते, स्कॉटलंड यार्ड पोलिसांचे प्रमुख होते. आता अचानक खंडणीचे आरोपी झाले?”, असा सवाल करत अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे आरोप, स्वत:च्या बचावासाठी आरोपी इतरांची नाव घेतो असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे.
अर्णव गोस्वामीला घरातून उचलून आणताना परमवीर सिंग गळ्यातले ताईत होते, स्कॉटलंड यार्ड पोलिसांचे प्रमुख होते. आता अचानक खंडणीचे आरोपी झाले? pic.twitter.com/sSQsQID0p3— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 3, 2022
दरम्यान सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे(Environment Minister Aditya Thackeray) यांनी दबाव टाकला असल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. यावरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचीही नावे घेतली जात होती. विरोधी पक्षाने त्याचे भांडवल करायचे ठरवले असेल तर, त्यांनी करत राहावे. कोण कोणाचे नाव घेत आहे, यावर परसेप्शन ठरत नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- SSC-HSC Board Exams: दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार ; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाचा निर्णय
- शैक्षणिक व आर्थिक क्रांती घडवून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित शिवजयंती साजरी करू-विनोद पाटील
- “ पृथ्वी शॉ तर दुसरा सेहवाग ”; ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे वक्तव्य
- Ramesh Deo: माधुरी दीक्षित, महेश मांजरेकरसह सेलिब्रिटींनी दिला आठवणींना उजाळा, सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली
- “कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी…”,पडळकरांचे ट्वीट ठरतेय चर्चेचा विषय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
