पुणे – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचा मुलगा अक्षय व यशश्री यांचा साखरपुडा पुणे येथे झाला. या कार्यक्रमात अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्याने या सोहळ्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचा मुलगा अक्षय व यशश्री यांचा साखरपुडा पुणे येथे झाला. या कार्यक्रमास उपस्थित राहून उभयतांना शुभाशिर्वाद दिले. pic.twitter.com/BCUukQxeLT
— Supriya Sule (@supriya_sule) August 20, 2021
या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. विशेष बाब म्हणजे धनंजय मुडे यांनी या कार्यक्रमाला पत्नी राजश्री मुंडे यांच्यासह हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी केलेल्या विविध आरोपांमुळे धनंजय मुंडे हे चर्चेत आहेत. यातच आता मुंडे यांनी पत्नी राजश्री मुंडे यांच्यासह हजेरी लावल्याने हा फोटो लक्षणीय ठरला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या सोहळ्यातील फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, सुळे यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर लोकांनी त्यांना कोरोना नियमांची आठवण करून दिली आहे. कारण या फोटो वरून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. उपस्थित मान्यवरांनी मास्क लावलेले सोशल डीस्टंसिंगचे देखील पालन केले नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आग्रह धरताना दिसून येत आहेत. तसेच ते तिसरी लाट जर आली तर पुन्हा टाळेबंदी करावी लागले असं सांगत आहेत.मात्र अश्या सोहळ्यांमध्ये जर लोकप्रतिनिधी कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करत असतील तर नियमांचे पालन सर्वसामान्य जनतेनेच का करावे असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपसोबत सलगी करायची म्हणून राज ठाकरे राष्ट्रवादीला टार्गेट करत असावेत’
- ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- खासदार नवनीत राणांवर मानहानीचा दावा ठोकणार, यशोमती ठाकूर यांचा इशारा
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

