Share

भाजपची भूक कशी भागत नाही, भाजपा पक्ष आहे की बकासुर : बाळासाहेब थोरात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षांतराच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमधील मेळाव्यात बोलताना ‘भाजपाने सत्ता स्थापनेसाठी जे कर्नाटकात व गोव्यात केले ते अवघ्या देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रातही फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. भाजप – सेनेची सत्तेची भूक भागत नाहीये. भाजप हा सत्तेचा हव्यास असलेला बकासूर असून एक दिवस पोट फुटून जाईल, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाना साधला.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी विधानसभेच्या निवडणुका आटोपल्यानंतर दिवाळीनंतर पक्ष संघटनेचा विस्तार करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी प्रत्येकाने निवडणुकीत केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाईल, त्याचबरोबर पक्ष संघटनेवर असलेली निष्ठादेखील विचारात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!