सातारा – जप्तीची कारवाई झालेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज दिलेल्या दोन सहकारी बँकांना सक्तवसुली संचालनालयानं नोटिस पाठवली आहे. संचालनालयानं जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती आणली आहे. हा साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांनी ही नोटिस मिळाल्याची पुष्टी केली आहे. कर्जाचा तपशील देण्यास या बँकांना सांगण्यात आलं आहे. सक्तवसुली संचालनालय या बँकेच्या अनियमित कर्ज विषयक व्यवहारांवर लक्ष्य ठेवून आहे तथापि, या बँकांच्या अध्यक्षांनी या कर्जामध्ये कोणतीही अनियमितता नाही असं स्पष्ट केलं आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीची नोटीस आली असून कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर्स या कारखान्यासाठी नेमके किती कर्ज वितरित करण्यात आले याबाबतचा खुलासा ईडीच्या नोटीस मध्ये मागवण्यात आला आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी या नोटीस बाबत खुलासा केला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी या नोटिशीसंदर्भात खुलासा केला आहे. ईडीच्या नोटीस संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी दिली आहे.राजेंद्र सरकाळे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुस्थितीत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- बैलगाडीवरुन पडलेल्या काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवणाऱ्या भाजपला भाई जगताप यांचं प्रत्युत्तर
- केएल राहुल फिरतोय आथिया शेट्टीच्या भावासोबत ; नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स
- दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनातील ११ कर्मचारी बडतर्फ
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार; शरद पवारांनी दिला चर्चांना पूर्णविराम


