Share

ब्रुक फार्माच्या मालकाच्या चौकशीवेळी भाजप नेते वकिलीसाठी का गेले ? मलिकांचा घणाघात

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं आहे.

आता हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले होते.

समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील समजत आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांकडे जवळपास 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशी दरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला होता. यामुळे काल दिवसभर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी रंगल्यानंतर आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

‘केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यानंतर देशांतर्गत रेमडेसिविरचा साठा पुरवण्यासाठी सात कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. ब्रुक फार्मा कंपनीकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. म्हणून या कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. योग्य कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले असून पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यास यावे लागेल असं सांगण्यात आलं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे राज्याचे दोन विरोधी पक्षनेते आणि भाजपचे दोन आमदार हे डोकानिया यांच्या वकिलीसाठी पोलीस ठाण्यात का गेले ?’ असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

‘राज्य सरकारला रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास नकार दिला होता. मात्र, दरेकर यांनी दमणला जाऊन भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात भाजपतर्फे ५० हजार इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल असं सांगण्यात आलं. मग भाजपचे आणि ब्रुक फार्मा या कंपनीचे काय संबंध आहेत हे भाजपने स्पष्ट करायला हवं. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते लगेच का तिथे दाखल झाले ? राज्य सरकारला साठा का उपलब्ध केला जात नाहीये ?’ असे सवाल उपस्थित करत मलिक यांनी यात काहीतरी गौडबंगाल असल्याची शंका व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!