मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएल पाठोपाठ पाकिस्तान प्रिमीअर लीग देखील स्थगित करण्यात आली होती. मात्र स्थगीतीनंतर पीएसएलचे उर्वरीत सामने हे सध्या अबुधाबीमध्ये खेळविण्यात येत आहे. या स्पर्धेदरम्यान पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सर्फराज अहमद आणि शाहिन अफ्रिदी यांच्यात एका सामन्यादरम्यान बाचाबाची उडाल्याचे बघायला मिळाले.
पीएसएल स्पर्धेत आबुधाबी येथे लाहोर कलंदर्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स या संघात सामना सुरु होता. १९ व्या षटकात गोलंदाज शाहिन अफ्रिदीने एक अखुड टप्प्याचा चेंडु टाकला होता. हा चेंडु फलंदाजी करत असलेल्या सर्फराज अहमदच्या हेल्मेटवर आदळला. या चेंडुवर सर्फराजने एक धाव घेतली. यानंतर तो गोलंदाज शाहिन अफ्रिदीजवळ गेला आणि गोलंदाजाला उद्देशुन काही टिप्पनी केली. या टिप्पणी नंतर शाहिन अफ्रिदी सर्फराजच्या अंगावर धावुन गेला. यावेळी दोघात चांगलीच बाचाबाची होणार असे वाटत असताना इतर खेळाडू आणि पंचानी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले.
Incase you missed it. https://t.co/UTtpvrgTd3
— ???????? (@bojackkxd) June 15, 2021
या सामन्यात क्वेटा ग्लॅडीएटर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना लाहोर कंलदरसमोर १५९ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात लाहोर संघ केवळ १४० धावांत सर्वबाद झाला. क्वेटा संघाकडुन सलामीवीर जेक वेथेरल्डने सर्वाधीक ४८ धावांची खेळी केली. क्वेटा ग्लॅडिएटर्सने हा सामना १८ धावांनी जिंकला. ३ गडी बाद करणाऱ्या उस्मान शिनवारीला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- व्हायरल व्हिडीओच्या त्या ट्विटमुळे स्वरा भास्कर सापडली अडचणीत
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- ‘…तरच मला टी-२० क्रिकेटमध्ये संधी मिळू शकेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण

