🕒 1 min read
अमरावती : अमरावतीतील अंजनगांव सुर्जी येथील मठातून दर्शन करुन निघाले असता शिवसैनिकांनी शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला केला होता. यावेळी पन्नास खोके एकदम ओके चे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले होते. बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओके, असे नारे देत त्यांच्या गाडीवर हाता- बुक्यांनी मारत नारेबाजी केली. दरम्यान या प्रकरणावर काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी संतोष बांगर यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे.
आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावती प्रतिक्रिया दिली. “आमदार संतोष बांगर हे पैसे घेऊन शिंदे गटात गेले, बंड झाला त्यावेळी आदल्या दिवशी संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते आणि दुसऱ्या दिवशी ते शिंदे गटात गेले त्यांना काय आमिष दिलं हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे लोकांचा रोष आहे. लोकांचा रोष आपण थांबवू शकत नाही”, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
संतोष बांगर काय म्हणाले?
यापूर्वी उदय सामंत यांच्यावर देखील हल्ला झाला होता. शिवसेना विरुद्ध शिंदे गट ही रस्त्यावरील अजून किती काळ चालणार, या प्रश्नावर बांगर म्हणाले, “आम्ही शिंदे गट नाही तर शिवसेना आहोत. हल्ला करणारे लेचे-चपाटे शिवसैनिक होऊ शकत नाहीत. १० लोक, ५ लोक फुटतील पण ५० लोक फुटले, त्यामुळे याच आत्मपरिक्षण त्यांना करावे लागेल. खासदार गेले, स्थानिक प्रतिनिधी गेले. मग खरी शिवसेना कोणती? आमची खरी शिवसेना आहे. ज्या बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. बाळासाहेब म्हणाले होतो, जर मला राष्ट्रवादी,कॉंग्रेस सोबत जाण्याची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेल. आम्हाला कोणी आरे-कारे केले तर बाळासाहेबांचे वाक्य त्यांच्या कानाखाली आवाज काढून सांगू”
संतोष बांगर म्हणाले की, “माझी पत्नी आणि बहीण गाडीमध्ये होती. यावेळी पन्नास खोके एकदम ओके नारे देत काही कार्यकर्ते गाडीसमोर आले आणि त्यांनी नारेबाजी केली. माझी पत्नी आणि बहीण सोबत नसती, तर त्यांना दाखवलं असतं की संतोष बांगर काय आहे. माझ्यासोबत पत्नी आणि बहिण असल्याने मला गाडीच्या खाली उतरता आलं नाही. नाहीतरी त्यांना पळता भुई कमी पडली असती. शिवसेनेच्या स्टाइलने त्यांना खेदू-खेदू मारलं असतं.”
नेमकं झालं काय ?
शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर आज अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल केला. संतोष बांगर यांच्या वाहनांचा ताफा अंजनगांव सुर्जी येथे येताच कार्यकर्ते वाहनांना आडवे गेले. यावेळी आमदार ज्या बाजूला गाडीत बसले होते त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला. परंतु, सुरक्षा रक्षकाने धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते. परंतु, बांगर यांनी आपली गाडी न थांबवता तेथून निघून गेले.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Patil | अजित पवारांनी फडणवीसांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…
- Tanaji Sawant | तानाजी सावंतांनी ‘त्या’ वक्तव्यावरुन मागितली माफी, म्हणाले…
- Viral Video | चित्ता आणि कासवाची खास मैत्री, VIDEO बघून व्हाल थक्क
- Shivbhojan Thali | गोरगरिबांच्या पोटाला पुन्हा चटके?, शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता
- Uday Samant | वेदांता गेल्यानंतर उदय सामंत गुजरात दौऱ्यावर, CM सोबत करणार चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
