Share

Sanjay Raut : लोकसभेत गट निर्माण केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल; संजय राऊतांचा खासदारांना इशारा

Published On: 

Shivsena। मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून 40 आमदारांना वेगळं केलं. यानंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या माध्यमांतून समोर येत होत्या. त्यामुळे शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली. आता शिवसेनेचे 14 खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. त्यात शिवसेना खासदार संसदेत वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, जे पक्षात आहेत तेच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे यासंदर्भात कोणी वेगळी भूमिका घेतली तर याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई लढली जाईल असा इशारा दिला आहे. शिवसेना पक्षाची स्थापनाच ही संघर्षातून झाली आहे. त्यामुळे आमदार आणि खासदारांनी पक्ष सोडला शिवसैनिक हे बरोबर आहेत. त्यामुळे याचा काही परिणाम पक्षावर होणार नाही. ग्राउंड स्तरावर वेगळे चित्र आहे. शिवसैनिकांच्या जोरावर पक्ष पुन्हा उभारी घेईल यामध्ये शंका नाही.

दरम्यान, शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीत आज शिवसेनेच्या 14 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली आहे. तसेच शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 14 खासदार उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून आपला नवा गट स्थापन करणार आहेत. तसेच या नव्या गटाचे संसदेतील नेते म्हणून राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच शिंदे गटाकडून आता खरी शिवसेना आमचीच यासाठीही प्रबळ दावे केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!