मुंबई : आपले राज्य तुळशी वृंदावन, इथे गांजा पीकवने शक्य नाही. असे उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिले होते. त्यावर आता भाजप नेते आ. अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाना साधला आहे. संजय राऊत साहेब हे राज्य साधुसंतांच, छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. परंतु या राज्याला गांजाड्याच व वसूली खोराचं राज्य म्हणून तुम्हीच प्रसिध्दी दिली आहे. अशी टीका भातखळकरांनी केली आहे.
संजय राऊत विरोधकांवर टीका करताना म्हणाले होते, ‘महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे, इथे तुळशीचं पीक जास्त आहे. पण काही लोकांना वाटतं की या राज्यात काही गांजा, भांग आपण पिकवू. पण ते शक्य नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर. मी मागे म्हणालो होतो, की यातूनही सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे, बाकी सगळं झालंय. उद्धव ठाकरे, शरद पवार, गांदी कुटुंबाचंही तेच म्हणणं आहे की हे सरकार ५ वर्ष टिकेल आणि भविष्यातही आम्ही एकत्र राहून काम केलं, तर २५ वर्ष हे सरकार हलणार नाही,’ असेही राऊत म्हणाले होते.
आपले राज्य तुळशी वृंदावन, इथे गांजा पीकवने शक्य नाही
– राऊत साहेब
.@rautsanjay61 साहेब हे राज्य साधुसंतांच, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. परंतु या राज्याला गांजाड्याच व वसुली खोराच राज्य म्हणून तुम्हीच प्रसिध्दी दिली आहे.— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) October 25, 2021
दरम्यान, पुढे राऊत म्हणाले की, मी समजू शकतो, की राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आणण्यात आम्ही खटपटी आणि लटपटी केल्या. त्याला यश आले. सरकार पाडण्यासाठी ज्यांनी पहिल्या दिवसापासून खटपटी-लटपटी केल्या, त्यांना अपयश आलं. राज्यात पुलोदनंतर असा प्रयोग पहिल्यांदाच घडला. आत्ताचे सरकार पुलोदचीच प्रतिकृती आहे. पुलोदचे नेते शरद पवार होते. आता देखील शरद पवार यांचं मार्गदर्शन, उद्धव ठाकरेंचा भक्कम पाठिंबा, गांधी परिवाराचे असलेलं पाठबळ यातून हे सरकार निर्माण झालेले आहे, असेही ते यावेळी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- ‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप
- “इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला


