मुंबई: भारतासमोरचे यक्षप्रश्न कोणते व ते कसे सोडवायचे? यावर कोणीच बोलत नाही. चर्चा होत आहे ती महाराष्ट्रातील अनैसर्गिक सत्तांतराची. अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया ‘80’ इतका खाली कोसळला. एक डॉलर विकत घेण्यासाठी आपल्याला 80 रुपये मोजावे लागत आहेत. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे गटांगळय़ा खात आहे. गॅसचे सिलिंडर 50 रुपयांनी महागले. त्यामुळे मध्यमवर्गीय समाज खचला आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना रोखठोक मधून म्हटले आहे.
स्विस बँकेत भारतीयांचे काळे धन 20,700 कोटी इतके होते. त्यात वाढ झाली असून ते आता 39,468 कोटी इतके झाल्याची अधिकृत माहिती समोर आली. त्यामुळे आता नागरिकांच्या खात्यात 15-15 लाख नाही, तर 40 ते 45 लाख रुपये मोदी सरकारकडून जमा होतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
काळ्या पैशांचा महापूर कसा आला ते महाराष्ट्रातील सत्तांतरात दिसून आले. गुवाहाटीच्या झाडाझुडपांचे वर्णन करणारे आमदार शहाजी पाटलांचा एक डायलॉग सध्या गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी मारलेला ‘पंच’ त्याहून जास्त चमकदार आहे. येथे थोडा स्वल्पविराम मारून आमदार गोरंट्याल पुढे म्हणतात, ‘पचास खोके; पक्के!’ एकदम ओक्के!’ या सगळ्यांची उघड चर्चा आता लोकांत सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आमचीच, असे सांगणाऱ्यांचे आत्मे या खोक्यांत बंदिस्त आहेत, असे श्री. गोरंट्याल सांगतात ते खोटे नाही. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा
- Malaika Arora : मलायकाचा साडीमधील हटके लूक पाहून चाहते घायाळ! पाहा VIDEO
- Ashadhi Ekadashi 2022 : मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेला ‘नवले’ दाम्पत्याला मिळाला ‘मानाचा वारकरी’ सन्मान
- Alok Nath : बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी ‘आलोक नाथ’ यांच्यावर खऱ्या आयुष्यात आहेत गंभीर आरोप
- CM Eknath Shinde : पंढरपूरच्या विकासासाठी विशेष आराखडा तयार करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

