मुंबई : महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज पत्रकार परिषदांचा धडाका लावत सरकारच्या वर्षपूर्तीच्या कारभाराला लक्ष्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाविकस आघाडी सरकारच्या कामगिरीचं काळ पुस्तक प्रकाशित केलं आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामानाला दिलेल्या मुलाखतीवरून घणाघात केला आहे. ‘एका वर्षात काय केले, पुढची दिशा काय, यावर मुख्यमंत्र्यांना सामनाच्या मुलाखतीत काहीच सांगता आले नाही. इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते, ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले.’ अशी टीका फडणवीसांनी केली.
एका वर्षात काय केले, पुढची दिशा काय, यावर मुख्यमंत्र्यांना सामनाच्या मुलाखतीत काहीच सांगता आले नाही.
इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते, ते संविधानाची शपथ सुद्धा विसरले: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 28, 2020
यावर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद पाहिली. विरोधी पक्षांनी त्यांच्या पद्धतीने आजचा दिवस सादर केला. त्यांच्या भावनांचा आदर करतो, असं संजय राऊतांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांचं एक विधान ऑन रेकॉर्ड आहे. देवेंद्र फडणवीसांनी सर्वांच्या कुंडल्या माझ्या हातात असल्याचं विधान केलं होतं. विरोध करणाऱ्यांच्या तुम्ही कुंडल्या जवळ ठेवल्या, मग ती कोणती भाषा?,’ असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका’
- ‘पवार कुटुंबाचा लोमत्या …जयंत पाटलांचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका’
- भारत भालके यांच्या निधनाने जनतेच्या हाकेला धावून जाणारा लोकनेता हरपला – रामदास आठवले
- ‘कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी’
- कंत्राट द्यायचे फडणवीस यांनी आणि हप्ता सरनाईक यांना कसा मिळतो ?


