मुंबई- महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सरकारमधील मंत्री ठाकरे सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचत आहेत तर विरोधक सरकार कसे अपयशी ठरले हे दाखवून देत आहेत.यातच खासदार नारायण राणे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मातोश्रीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री अडकले आहेत. त्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये ६५ हजार कोटींच कर्ज काढून राज्य दिवाळखोरीत नेलं असल्याचंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हाती गाडीचं स्टेरींग आहे, राज्याचं नाही. महाराष्ट्राला ड्रायव्हर द्यायचा नव्हता, मुख्यमंत्री द्यायचा होता. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री राज्याला मिळाले. महाराष्ट्राला ही सत्ता पोषक नाही.हे सरकार गेल्यानंतर दोन मार्ग आहेत. दोन पक्षापैकी एक पक्ष येईल किंवा राष्ट्रपती राजवट लागू शकेल. राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी समीकरण होऊ शकतं तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं असं राणे म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीने आता राणे यांच्यावर टीका केली आहे. हे सरकार यशस्वीपणे काम करत आहे. ते सक्षम आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आरोप करत सुटले आहे. फडणवीसांना विरोधी पक्ष नेतेपदाचा अनुभव कमी आहे. त्यामुळे त्यांचा त्रागा सुरू आहे, तर नारायण राणे हे गंजलेली तोफ आहे. त्याच्यामधून आलेल्या गोळ्यांना आम्ही अन् मातोश्रीही महत्त्व देत नाही अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अकोल्यात बोलताना टीका केली.
राष्ट्रवादीचे इस्लामपूर मतदारसंघ मर्यादित नेते जयंत पाटीलाना स्वतःला सगळं समजतं असा गैरसमज आहे. गंजलेल्या तोफा दुरुस्त होतात पण गंजलेले विचार दुरुस्त होत नाही. पाटील साहेब इतिहासात तुमची नोंद ही पवार कुटुंबाचा लोमत्या अशीच होणार. तुमचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 28, 2020
पाटील यांनी केलेल्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी दिले आहे. राष्ट्रवादीचे इस्लामपूर मतदारसंघ मर्यादित नेते जयंत पाटीलाना स्वतःला सगळं समजतं असा गैरसमज आहे. गंजलेल्या तोफा दुरुस्त होतात पण गंजलेले विचार दुरुस्त होत नाही. पाटील साहेब इतिहासात तुमची नोंद ही पवार कुटुंबाचा लोमत्या अशीच होणार. तुमचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका असा टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत : हुसेन दलवाई
- कोरोनाची दुसरी लाट येईल असे गृहीत धरून सज्ज राहूया : मुश्रीफ
- ‘एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून प्रशासन आणि सरकार कायद्याची चौकट मोडू शकत नाही’
- ‘कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी’
- कंत्राट द्यायचे फडणवीस यांनी आणि हप्ता सरनाईक यांना कसा मिळतो ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

