मुंबई –राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.
भारत भालके यांना कोविड-19 झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होतं. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (27 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.
भारत भालके यांच्या निधनाने अत्यंत मनमिळाऊ,जनसामन्यांच्या हाकेला धावून जाणारा कर्तृत्ववान लोकनेता आणि आमचा जवळचा मित्र हरपला आहे.अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
आमदार भारत भालके तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले.पंढरपूर मंगळवेढा भागाचा विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना निवडणुकीत जायंट किलर म्हणून ओळखले जात होते. पंढरपूर च्या राजकीय सामाजिक वर्तुळात रांगडा राजकीय पैलवान म्हणून लोकप्रिय होते.त्यांचे आंबेडकरी चळवळीशी मित्रत्वाचे नाते होते. आमच्याशी त्यांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते.त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादीकाँग्रेस चे नुकसान झाले नाही तर आमचेही वैक्तिक मोठे नुकसान झाले आहे अशी शोकभावना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत : हुसेन दलवाई
- ‘पवार कुटुंबाचा लोमत्या …जयंत पाटलांचं काय काय गांजलेल आहे बोलायला लावू नका’
- ‘एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून प्रशासन आणि सरकार कायद्याची चौकट मोडू शकत नाही’
- ‘कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी’
- कंत्राट द्यायचे फडणवीस यांनी आणि हप्ता सरनाईक यांना कसा मिळतो ?


