Share

‘फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका’

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज पत्रकार परिषदांचा धडाका लावत सरकारच्या वर्षपूर्तीच्या कारभाराला लक्ष्य केलं आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाविकस आघाडी सरकारच्या कामगिरीचं काळ पुस्तक प्रकाशित केलं आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामानाला दिलेल्या मुलाखतीवरून घणाघात केला आहे. त्यांनी केलेली विधानं, दावे, टीका यासंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका’ असा इशारा त्यांनी दिला. तर, ‘उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणं कधी जमलं नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीनं बदनाम करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे’ असं म्हणत मुडेंनी फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!