टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीत मिठाचा खडा पडणार असल्याच दिसत आहे. कारण शिवसेनेला समान जागा न मिळल्यास युतीत तुटणार असल्याच वक्तव्य शिवसेना खा. संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्याला दुजोरा देत संजय राऊत यांनी युतीबाबत शंका निर्माण केली आहे.
जागावाटपात शिवसेनेला समान जागा न मिळाल्यास युती तुटू शकते, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी केले केले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, विधानसभेसाठी प्रत्येकी 50 टक्के जागा वाटून घ्यायच्या हा फॉर्म्युला अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत ठरला होता. त्यामुळे रावतेंनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही.
दरम्यान शिवसेनेने भाजप समोर लोकसभा निवडणुकी वेळीच समान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या मेगा भरतीमुळे कोणता पक्ष किती जागा वाटून घेणार यावरून सेना भाजप मध्ये चर्चा सुरु आहे. मात्र शिवसेना पक्ष १४४ जागांवर अडून आहे तर भाजप तडजोड करण्यास भाग पडत आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी केली असल्याच स्पष्ट दिसत आहे.
- तीन जणांनाच युतीबद्दल बोलण्याचा अधिकार; महाजनांचा रावतेंना टोला
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष
- शरद पवारांनी बीडमध्ये जाहीर केली राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

