Share

तीन जणांनाच युतीबद्दल बोलण्याचा अधिकार; महाजनांचा रावतेंना टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे वक्तव्य दिवाकर रावतेंनी केल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे .यानंतर खासदार संजय राऊत यांनीही त्यांचे वक्तव्य चुकीचे नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते गिरीश महाजनांची अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. युतीबद्दल बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश महाजन म्हणाले की रावतेंनी केलेल्या जागावाटपाच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. युतीच्या जागावाटपाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरचा आहे. त्याबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तीन जणांनाच आहे, असाही टोला त्यांनी रावते यांना लगावला.

तसेच ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीन जणांनाच युतीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. युती होणारच आहे. पुढच्या चार -पाच दिवसांत जागावाटपाचा प्रश्न सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान लोकसभा निवडणुकीआधी युती करताना भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचं, तसेच विधानसभेला शिवसेनेला १४४ म्हणजेच निम्म्या (२८८ पैकी १४४ ) जागा देण्याचं आश्वासन भाजपने दिलं होते. त्यामुळे जर शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रावते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये म्हणाले होते .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!