पुणे: शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. या संबंधी पीडित मुलीने शनिवारी महिला आयोगाकडे मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. या संबंधी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
दरम्यान या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने महिला आयोगाकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. चित्रा वाघ आणि पीडित मुलगी संगनमताने त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहे. त्यामुळे आमच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे, अशी तक्रार कुचिक यांच्या मुलीने केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे.
महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम काही जणांकडून केला जात आहे, माझी विनंती आहे पोलिसांना मध्ये आणू नये. खोटे आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून पाहावी उगीच आरोप करू नये, येत्या 3 ते 4 दिवसात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं म्हणत चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:


