Share

“…यावरही संजय राऊतांनी कधीतरी लेख लिहावा”, पडळकरांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शेतकऱ्यांच्या वीजतोडणीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकऱ्यांची वीज कापली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत त्यांना सल्ला दिला आहे.

“राऊत तुम्ही वाय दर्जाच्या सुरक्षेबाबत लेख लिहिता. पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात बिनधास्त फिरवून दाखवा, म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल. उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. संजय राऊत यांनी यावर कधीतरी एखादा लेख लिहावा”, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखात  ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून मोदी -शहांच्या राज्यात हे असे का घडावे? लोकांना भयमुक्त, शांतपणे का जगता येऊ नये? सरसकट होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची वेळ मोदी सरकारवर का यावी?”, यावरून सध्या भाजपकडून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!