Share

Kirit Somayya | “संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार” ; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पत्रा चाळ घोटाळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी आज पहाटे संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांची घरी चौकशी सुरू आहे. त्यांच्या अटकेची देखील शक्यता आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. माझा कोणत्याही घोटाळ्याशी काहीही संबंध नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवले आहे. मी शिवसेनेसाठी लढत राहणार आहे. ईडीची कारवाई खोटी असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“ईडीच्या कारवाईचं स्वागत करत आहे. संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागणार. पत्रा चाळ घोटाळा किंवा वसई नायगाव इथला बिल्डरचा घोटाळा असो माफियागिरी दादागिरी करणाऱ्या प्रत्येकाला जेलमध्ये पाठवणार. महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न सुरू होता त्याचा आता हिशोब द्यावा लागणार. माफिया संजय राऊत यांना पण हिशोब द्यावा लागणार,” असे किरीट सोमय्या म्हणाले.

संजय राऊत यांचा हिशोब होणार-

किरीट सोमय्या म्हणाले, “संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार, सगळा हिशोब द्यावा लागणार आहे. संजय राऊत यांची लूटमार, माफियागिरीचे मी पुरावे दिले होते. महाविकास आघाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. राज्यातील जनतेची लूट करणाऱ्या संजय राऊतांचा हिशोब होणार आहे”

संजय राऊत ED यांना ताब्याच घेण्याची शक्यता-

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर रविवारी सकाळी मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे एक पथक मुंबईतील त्यांच्या भांडुप येथील घरी पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तपासात असहकार्य केल्यामुळे हे पथक त्यांच्या घरी पोहोचले. ईडीचे पथक राऊतला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करू शकते, असे मानले जात आहे.

ईडीने संजय राऊत यांना समन्स बजावले होते-

महाराष्ट्रातील 1000 कोटींहून अधिक रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक संजय राऊत यांची आधीच चौकशी करत आहे. त्यांना ईडीने 27 जुलै रोजी समन्स बजावले होते. मात्र, तो अधिकाऱ्यांसमोर हजर झाला नाही. यानंतर आता ईडीचे अधिकारी त्याच्या घरी पोहोचले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण-

मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळ हे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे क्षेत्र आहे. यामध्ये सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे मित्र आहेत. या भागात 50 हजार फ्लॅट बनवण्याचे काम एका खासगी कंपनीला मिळाले. पण 2011 मध्ये त्यातील काही भाग इतर बिल्डरांना विकण्यात आला. या प्रकरणात संजय राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!