मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वारंवार वाढ होत आहे. याप्रकरणी अनेक खुलासे होत असून ईडीने आता काही नवनी खुलासे केले आहेत. संजय राऊतांनी राऊत एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीच्या माध्यमातून ‘ठाकरे’ सिनेमा काढला होता. या सिनेमात बेहिशोबी पैसे वापरले असल्याची माहिती समोर आली आहे. स्वप्ना पाटकर यांनी अनेक दावे केले आहेत.
स्वप्ना पाटकर यांनी ईडीला दिली माहितीः
पत्राचाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला चौकशीत अनेक माहिती दिली आहे. त्यनुसार, संजय राऊतांनी, राऊत एन्टरटेनमेंट एलएलपी कंपनीच्या माध्यमातून ‘ठाकरे’ सिनेमा काढला होता. राऊतांनी या सिनेमात बेहिशोबी पैसे वापरला आहे. एप्रिल २०२१ मध्ये अधिग्रहित केलेल्या मद्य कंपनीमध्ये राऊतांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत असा दावा स्वप्ना पाटकर कडून करण्यात आला आहे.
संजय राऊत यांच्यावर आरोपः
पाटकरांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये मराठी सिनेमा बाळकडू रिलीज करण्यात आला होता. हा सिनेमा कुठल्याही लाभाशिवाय बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली म्हणून काढण्यात आला. मात्र या सिनेमानं ६० लाख रुपये निव्वळ नफा कमवला. त्यापैकी राऊतांनी ५० लाख रुपये माझ्या बँक खात्यातून मला चेक देण्यास भाग पाडले, अशी माहिती स्वप्ना पाटकरने ईडीला दिली आहे.
दरम्यान, 1034 कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. १ ऑगस्ट रोजी त्यांना ईडीने मध्यरात्री अटक केली होती. अनेक वेळा सुनावणी होऊन देखील संजय राऊत यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :
- Raju Srivastav Death | सर्वांना हसवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड! राजू श्रीवास्तव यांचा जगाला अखेरचा निरोप
- Nirmala Sitaraman | ‘मिशन बारामती’साठी निर्मला सीतारामन यांचा पुणे दौरा, 21 कार्यक्रमांचं आयोजन
- Sushma Andhare| शिवसेना महिला नेत्यानं रामदास कदम यांना दिला इशारा म्हणाल्या…
- Supriya Sule | “…तर मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी लागेल”
- Shahajibapu Patil | “हा बाबा पहाटेच मंत्रालयात येऊन…”; शहाजीबापूंचा अजित पवारांवर हल्लाबोल


