Share

Nirmala Sitaraman | ‘मिशन बारामती’साठी निर्मला सीतारामन यांचा पुणे दौरा, 21 कार्यक्रमांचं आयोजन

Published On: 

🕒 1 min read

पुणे : असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भाजप पक्षाचं ‘मिशन बारामती’ गुरुवार पासून सुरु होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात सत्ता मिळावी यासाठी हे मिशन असून त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी पुण्यात येणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौराः

दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा आहे. या दौऱ्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात शाब्दिक लढाई पाहायला मिळेल.

२१ कार्यक्रम आयोजित केलेः

मिशन बारामती मोहिमेला प्रत्यक्ष गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. अमेठी मतदारसंघ जिंकला, आता बारामतीही जिंकणार, असा विश्वास या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. निर्मला सीतारामन यांचा पुणे दौरा हा तीन दिवसांचा आहे. तसेच हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत आणि यामध्ये २१ कार्यक्रम आयोजित केले आहेत.

परिवार सन्मान बैठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, संघटनात्मक तयारी आढावा, मंडल आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका, सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, मोर्चा पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद, भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा, सहकारी आणि व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर बेठक, महिला मोर्चा आणि युवक पदाधिकाऱ्यांशी संवाद सीतारामन साधणार आहेत. शासकीय अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी त्या आढावा बैठकही घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!