Share

‘पंतप्रधान दिल्लीत माझं भाषण ऐकत आहेत’ ; संजय राऊत यांचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद सुरु झाली असून यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री,आमदार, खासदार या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भवनात उपस्थित आहेत. विशेष म्हणजे संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी दाखल होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघायला मिळाला. तसेच ते येथे दाखल होताच त्यांच्या हातात खूप मोठ्या फाईल्स दिसून आल्या. यावेळी बोलत असतांना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याच सोबत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर देखील खरमरीत टीका केली आहे. पत्रकार परिषदेची सुरुवात त्यांनी मला वाटतंय ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे, असे म्हणत केली. तसेच अनेक नेत्यांचे सकाळपासून फोन आल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आणखी एक महत्वाचं वक्तव्य केलं. संजय राऊत यावेळी म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे दिल्लीत बसून माझं भाषण ऐकत आहेत. या पत्रकार परिषदेच्या आधीच भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे या पत्रकार परिषदेकडे बघून दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!