मुंबई : शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी एका खाजगी वृत्तवहिनीला मुलाखत दिली होती. यानंतर त्यांच्या या मुलाखतीमधील वक्तव्यांची अनेकांनी खिल्ली उडवल्याचे दिसून येत आहे.
संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं की, ‘WHO ला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. WHO म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नही. कंपाऊंडरकडून घेतो. कारण त्यांना जास्त कळतं.’
रशियाने सुरु केलं लसीचं उत्पादन; ५० कोटी डोस तयार करणार
आता संजय राऊत यांच्या या विधानावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील ट्विट करत भाष्य केले आहे. “पहिल्यांदाच मी संजय राऊत यांच्याशी सहमत आहे. WHO बाबत ते बरोबर आहेत. तसही WHO ला काय माहिती आहे? याच WHO ने बृहन्मुंबई महानगरपालिकेला आणि महाराष्ट्र सरकारला धारावी कोरोनामुक्त केलेल्या बाबत श्रेय दिले होते, जे खरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामुळे झाले. ते कधी कधी खरं बोलतात…बाकी बकवास” , अशी उपरोधिक टीका नितेश राणे यांनी केली आहे.
First time I agree with Sanjay Raut!
He is right abt WHO..
What does WHO know anyways?
The same WHO had given all the credit to BMC n Maha Gov for making Dharavi Corona free when it was the @RSSorg that did the real work!
He speaks the truth SOMETIMES.. baki Bakwaas!!!— Nitesh Rane (@NiteshNRane) August 16, 2020
धोका वाढला : देशातली कोविड रुग्णांची संख्या २६ लाखांच्या उंबरठ्यावर
दरम्यान, ‘कोरोनाच्या संकटात डॉक्टर देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी असं विधान करणं म्हणजे डॉक्टरांचा मोठा अपमान आहे. त्यामुळे संजय राऊतांनी राज्यासह देशातील सर्व डॉक्टरांची माफी मागावी,’ अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली.
२०२४ ची लोकसभा निवडणूक लढायला हवी; भाजप खासदाराचा धोनीला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

