Share

धोका वाढला : देशातली कोविड रुग्णांची संख्या २६ लाखांच्या उंबरठ्यावर

Published On: 

नवी दिल्ली : देशभरात कोविड -19 ची रुग्णसंख्या 25 लाख 89 हजार 682 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत देशात 63 हजार 490 नवीन रुग्णांची भर पडली. आतापर्यंत एकंदर 18 लाख 62 हजार 258 जण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 71 पूर्णांक 91 शतांश टक्के झाला आहे.

या आजारामुळे देशात आता पर्यंत 49 हजार 980 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशाचा कोविड मृत्यूदर 1 पूर्णांक 93 शतांश इतका आहे. देशभरात सध्या 6 लाख 77 हजार 444 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशभरात आता पर्यंत एकंदर 2 कोटी 93 लाख 9 हजार 703 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. काल एका दिवशी 7 लाख 46 हजार 608 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

दरम्यान, राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या १२,६१४ रुग्णांचे निदान झाले असून ३२२ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ८४ हजार ७५४ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८२ टक्के असून मृत्युदर ३.३८ टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ५६ हजार ४०९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात शनिवारी ६,८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत ४ लाख ८ हजार २८६ रुग्ण कोविडमुक्त झाले. एकूण मृत्यू १९ हजार ७४९ झाले. सध्या १० लाख ४४ हजार ९७४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात तर ३७ हजार ५२४ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जिवलग व्यक्तीचे झाले निधन

पुणेरी पत्रकाराच्या खोचक प्रश्नाने ट्रम्पनाही केलं निरुत्तर

‘आपल्याकडे दातेंसारखे पत्रकार आहेत पण मोदीजी पत्रकार परिषद घेतील तेव्हा ना …’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!