Share

२०२४ ची लोकसभा निवडणूक लढायला हवी; भाजप खासदाराचा धोनीला सल्ला

Published On: 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने निवृत्ती घेऊन तासभरही झाला नाही त्यातच मित्र सुरेश रैनाने देखील आपली निवृत्ती जाहीर केलीये.

गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख होती. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला.

धोनीच्या निवृत्तीनंतर भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. “एम.एस.धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे आणि अन्य कोणत्याही बाबींमधून निवृत्ती घेत नाही. त्यानं जे कौशल्य आणि संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता क्रिकेटमध्ये दाखवली त्याची सार्वजनिक आयुष्यातही गरज आहे. त्याला २०२४ ची लोकसभा निवडणूक लढायला हवी,” असं स्वामी म्हणाले.

महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद विसरता येणार नाही- अजित पवार

‘धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल असा विश्वास होता’

धोनीच्या निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकने बीसीसीआयकडे केली ‘ही’ मोठी मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!