नवी दिल्ली : रशियाने जगातील पहिली कोरोनाची लस तयार केल्याचा दावा केला आहे. इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने शनिवारी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनास रशियाने सुरुवात केल्याचे वृत्त दिले आहे.
दरम्यान, अनेक देशांचा या लसीवर विश्वास नसल्याचं दिसून येत असलं तरीही गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीनद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘स्पुटनिक – व्ही’ या करोना विषाणूवरील लसीचं उत्पादन सुरू करण्यात आल्याचं रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
पुढील वर्षभरात करोना विषाणूच्या लसीचे देशात ५० कोटी कोटींपेक्षा अधिक डोस तयार करण्यास सक्षम असल्याचं रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर आता व्हियतनाम आणि इस्त्राईल व्यतिरिक्त फिलिपींस सुद्धा रशियाची लस खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचं समोर येत आहे.
दरम्यान रशियात तय़ार झालेल्या लसीची चाचणी करण्यासाठी फिलिपींसकडून परिक्षण केलं जाणार आहे. त्यातून लसीच्या क्षमतेबाबत माहिती मिळवता येऊ शकते. हे ट्रायल ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. एप्रिल २०२१ पर्यंत ही लस सर्वसामन्य लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकते.
पुणेरी पत्रकाराच्या खोचक प्रश्नाने ट्रम्पनाही केलं निरुत्तर
‘आपल्याकडे दातेंसारखे पत्रकार आहेत पण मोदीजी पत्रकार परिषद घेतील तेव्हा ना …’
‘धोनी टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल असा विश्वास होता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

