🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ४ नेत्यांना स्थान मिळाले आहे. १ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रिपद महाराष्ट्राच्या पारड्यात पडले आहे. नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर, अनेक दिग्गज नावे या स्पर्धेत होती. प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले, हिना गावित यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागू शकते अशा चर्चा होत्या.
दरम्यान, भाजपच्या निष्ठावंताना डावलण्यात आल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तर, सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच मराठा समाजाची भूमिका मांडणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांना मंत्री न केल्याने त्यांच्या समर्थकांनी नेत्यांना जाब विचारावा असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी चिंचवडमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
‘दोन्ही छत्रपतींना मंत्रिमंडळात घेतले नाही. याबाबत त्यांच्या समर्थकांनी विचारणा करावी,’ असं संजय राऊत म्हणाले. यासोबतच, ‘पंकजा मुंडे यांना राजकारणातून संपवण्याचे काम सुरु असल्याची चर्चा सुरु आहे,’ असा पुनरुच्चार देखील संजय राऊत यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार?’ ; पटोलेंचा टोला
- ‘५५ आमदारात मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा महापौर का होणार नाही?’
- ‘इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला, केंद्रातही आणि राज्यातही’ ; फडणवीसांचा टोला
- ‘मला, भागवत कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवले’, देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
