पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. हा समावेश करताना जुन्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांसह मोदी पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. या बदलाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यातच आज विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. ‘जोपर्यंत आज्ञा असेल तोपर्यंत आम्ही विरोधात बसणार आहोत,’ असे मोठे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी आता किती दिवस विरोधात बसणार?, असा सवाल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी सूचक विधान केलं. ‘जितका काळ विरोधात बसायचं, म्हणजे आम्हाला आज्ञा असेल तोपर्यंत विरोधात बसणार’ असे उत्तर त्यांनी दिले आहे.
तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना मोदी सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवं अशी बोचरी टीका केली होती. याचा देखील यावेळी फडणवीसांनी चांगलाच समाचर घेतला आहे. ते डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य काँग्रेसबद्द्दल बोलत आहे का? असा प्रतिसवाल उपस्थित करतानाच ते म्हणाले इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला आहे. जो केंद्रातही आणि राज्यातही आहे. असा खरमरीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चाची भाषा समजत नसेल तर ठोक मोर्चा काढू-जावळे पाटील
- महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयात दिली शेणाची गौरीची भेट, इंधन दरवाढीचा निषेध
- कोविडचा फायदा घेत मुंबईतील 500 गृहनिर्माण सोसायट्या प्रशासकांकडून परस्पर बिल्डरच्या घशात?
- रिक्षा चालकाने प्रवासी वृध्दाची बॅग लांबवली
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

