🕒 1 min read
नवी-दिल्ली : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांनाच आता पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता आयआयटी कानपूरचे प्राध्यापक महेंद्र अग्रवाल(Mahendra Agrawal) यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्णसंख्या आढळू शकते, असा दावा केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अग्रवाल म्हणाले की,’जानेवारी महिन्याच्या अखेरीस देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्णसंख्या आढळू शकते.. तसेच कडक निर्बंधांमुळे ही लाट काही काळानंतर नक्कीच येईल, पण नंतर ती दीर्घकाळ राहील,’असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मुंबईतील तिसरी लाट या महिन्याच्या मध्यभागी कुठेतरी शिगेला पोहोचलेली असेल. आमच्या सध्याच्या गणनेनुसार, हा प्राथमिक अंदाज आहे. कारण आमच्याकडे संपूर्ण भारतासाठी पुरेशी माहिती नाही. आम्हाला आशा आहे की भारतात पुढील महिन्याच्या सुरुवातीला कुठेतरी लाट शिगेला पोहोचेल. लाटेच्या पीकची उंची सध्या योग्यरित्या कॅप्चर केली जात नाही कारण पॅरामीटर वेगाने बदलत आहेत. परंतु आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार, आम्ही एका दिवसात चार ते आठ लाख प्रकरणांच्या विस्तृत श्रेणीचा अंदाज लावला आहे’, असे अग्रवाल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘…तर घटनात्मक तरतुदींनुसार करायच्या इतर अनेक गोष्टी का डावलल्या जातात?’
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
- ‘विरोधकांनी नियमावली पाळायची आणि सत्ताधाऱ्यांनी ती धुडकावली तरी…’, राऊतांचा हल्लाबोल
- “…त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल”
- ‘राबडीदेवी म्हटलं फूलन देवी नाही’; रश्मी ठाकरेंवरच्या ‘त्या’ व्यक्तव्याला चंद्रकांत पाटलांचे समर्थन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
