Sanjay Raut | मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जामीनानंतर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही वेळा पुर्वीच संजय राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलं होतं. अशातच त्यांनी पुन्हा एकदा कौतुक केलं आहे.
पत्रकार परिषद दरम्यान, मी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचं कारण म्हणजे माझे काही प्रश्न आहेत, तुरुंगातील प्रश्न आहेत, कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, जे मी डोळ्यांना पाहिलेत, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. तसेच राज्य उपमुख्यमंत्रीच चालवतात बाकीचे फक्त गुंडळतात, असा टोला देखील संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
दरम्यान, फडणवीसांनी राजकारणातील कटुता दूर केली पाहिजे, असं केलेल्या वक्तव्याचं देखील संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे. तसेच राजकारणातील कटुता दूर झालीच पाहिजे, असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.
तुरुंगात असताना संजय राऊतांचा दिनक्रम समोर आला होता. यामध्ये ते रोज वृत्तपत्र वाचतात, लिखाण करतात, अशा गोष्टी समोर आल्या होत्या. अशातच जेलमध्ये असतांना मी पेपर वाचायचो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषतः गरीबांना घर देण्यासंदर्भात आणि ‘म्हाडा’ला अधिकार देण्यासंदर्भात फडणवीस यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. यावेळी सध्या राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवतात, असं संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा संजय राऊतांना दिल्लीहून फोन, राऊतांनी दिली माहिती
- T20 World Cup | टीम इंडियाच्या विजयासाठी ‘या’ खेळाडूंना करावी लागणार अप्रतिम कामगिरी
- IND vs ENG T20 WC | इंग्लंडने टॉस जिंकला, भारत करणार प्रथम फलंदाजी
- Gujrat Election | मोठी बातमी! रविंद्र जडेजाच्या पत्नीला गुजरात निवडणूकीसाठी भाजपकडून तिकीट
- Sanjay Raut । “माझी अटक राजकीय होती आणि…”; राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर


