नवी दिल्ली : सोशल माध्यमातील महत्वाचा अँप्लिकेशन बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या सोशल मीडियावर राजकीय लोक ते बॉलीवूड मधील कलाकार आपले मत ठाम पण मांडतात ते अँप्लिकेशन म्हणजेच ट्विटर आता बंद होण्याची शक्यता आहे. समाजमाध्यमातील एक प्रमुख ट्विटरवर कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. ‘लेहला’ जम्मू काश्मीरचा भाग दाखवल्याने ट्विटरवर ही कारवाई होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. याबाबत नोटीसही पाठविण्यात आली आहे.
भारत सरकारच्या आयटी मंत्रालयाकडून ट्विटरवर कारवाई होण्याची शक्यता आहे. ट्विटरने ९ नोव्हेंबरला ‘लेहला’ जम्मू काश्मीरचा भाग दाखवला होता. या प्रकरणी आयटी मंत्रालयाने ट्विटरला नोटीस जारी केली आहे. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अपमान केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, अशी नोटीस ट्विटरला पाठवण्यात आली आहे.
या नोटिसीला ट्विटरने पाच दिवसांत उत्तर द्यायचे आहे. अन्यथा ट्विटरवर कारवाई होऊ शकते. जर ट्विटरनं शनिवारपर्यंत यावर उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात गंभीर कारवाई केली जाईल,’ असेही सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- “राहुल गांधी विद्यार्थ्यांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत, पण त्यांची योग्यता नाही.”- बराक ओबामा
- खोटे सोने खरे भासवून १३४ जणांनी काही कोट्यावधी रुपयांचे कर्ज उचलले; आणखी एका बँकेला गंडा!
- ‘भाजयुमो’ ची महत्वाची तिनही पदे नेत्यांच्या पुत्रांना; कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?
- ग्रामीण भागातील रस्त्यांची वाळू वाहतुकीमुळे दुरवस्था; पोपट पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
- त्या पिडीत महिलेला दहा लाखांची मदत; राज्यमंत्री बच्चू कडू यांची घोषणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

