मुंबई: नेपाळमध्ये खासगी भेटीवर गेलेले राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये पोहोचले व पार्टीत सहभागी झाले यावर भारतीय जनता पार्टीने चर्चा सुरू केली. देशात इतके भयंकर प्रश्न निर्माण झाले असताना राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये कसे काय जाऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित केल्याने काँगेस पक्षाची अडचण झाली आहे. भाजपने काँग्रेसवर टीकेचा भडिमार केला आहे. जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत कसलेही राजकारण करू शकतात, त्यांच्याकडून दुसरी कोणतीच अपेक्षा करता येणार नाही. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केली आहे. मात्र यावरूनच भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
” घालीन लोटांगण, वंदीन चरण! इति पडलो जरी, उताणे आम्ही?”, असे ट्वीट राम कदम यांनी केले आहे. दरम्यान संजय राऊत यांना भाजपने नेहमीच शरद पवारांचे चेले म्हणून डिवचले आहे. मात्र आता त्यांनी सामनातून राहुल गांधींची बाजू मांडल्याने आता भाजपने काँग्रेसचा मुद्दा पकडून टीका करण्यास सुरुवात केली आहे.
!! घालीन लोटांगण… वंदीन चरण… !!
इति… पडलो जरी.. उताणे आम्ही … ? https://t.co/qjTRfAC9Sy
— Ram Kadam (@ramkadam) May 5, 2022
दरम्यान गांधी हे नेपाळमध्ये पत्रकार मित्राच्या लग्नासाठी गेले आहेत. इतर कोणी राजकीय नेते अशा खासगी दौऱ्यावर जात नाहीत का? व गेल्यावर पंचतारांकित हॉटेल्समधल्या पार्टीजना हजर राहत नाहीत का? असा टोला लगावत संजय राऊत यांनी राहुल गांधींची बाजू मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 RCB vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज जवळपास स्पर्धेबाहेर..! बंगळुरुसमोर धोनीसेना ढेपाळली आणि…
- IPL 2022 RCB vs CSK : विराटची गाडी पुन्हा अडकली..! बंगळुरुचं चेन्नईला १७४ धावांचं आव्हान!
- “उध्दवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी…”- देवेंद्र फडणवीस
- पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न नडला; संदीप देशपांडे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल!
- भीमा कोरेगाव दंगल प्रकरण, संभाजी भिडेंना क्लीन चीट


