Share

पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न नडला; संदीप देशपांडे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल!

Published On: 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी करत आक्रमक झाले होते. या पाश्वर्भूमीवरून राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना गाडीला धक्का लागल्याने एक महिला पोलीस कर्मचारी रसत्यावर कोसळल्याची घटना घडली होती. यावरून आता संदीप देशपांडे आणखी मोठ्या संकटात सापडले आहेत.

संदीप देशपांडे यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा गाडीला चकमा देण्याचा प्रयत्न नडला आहे. या दोघांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. राज ठाकरे भोंगे उतरवण्यावर ठाम राहिल्याने मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी राज्यभर हनुमान चालीसा लावत वातावरण जास्त पेटवले. पोलिसांनी इशारा दिल्यानंतरही मनसे नेते हनुमान चालीसा लावत असल्याने पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरु केली आहे.

औरंगाबाद सभेत नेमेके राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत भाषण सुरु असताना, मध्येच अजान वाजलं होत. यावर संतापून राज ठाकरे म्हणाले, “जर हे सभेच्य वेळेला भांग देणार असतील, भांग सुरु करणार असतील तर आपण आताच्या आता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. जर यांना सहज आणि सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, मला माहिती नाही. पोलिसांनी आताच्या आता जाऊन हे बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ देत. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही, हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून जर समजात नसेल, महाराष्ट्राचं मनगटात काय टाकत आहे हे यांना दाखवावंच लागेल. माझी पोलिसांना विनंती आहे की, या लोकांची थोबाडं बंद करा. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. हे भोंगे उतरवले गेले पाहिजेच. अभी नही तो कभी नही.”

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!