Share

IPL 2022 RCB vs CSK : विराटची गाडी पुन्हा अडकली..! बंगळुरुचं चेन्नईला १७४ धावांचं आव्हान!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ४९वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs CSK) यांच्यात रंगत आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिकच्या महत्त्वपूर्ण धावांच्या जोरावर बंगळुरुने चेन्नईला १७४ धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईकडून महिश थिक्षणाने तीन बळी घेतले.

बंगळुरुचा डाव

कप्तान फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी पहिल्या गड्यासाठी ६२ धावांची सलामी दिली. फिरकीपटू मोईन अलीने दोघांना माघारी धाडले. त्याने डु प्लेसिसला (३८) झेलबाद तर विराटला (३०) क्लीन बोल्ड केले. ग्लेन मॅक्सवेल (३) धावबाद झाला. रजत पाटीदारही (२१) मोठी खेळी करू शकला नाही. फिरकीपटू महिश थिक्षणाने आपले जाळे बनवले आणि तीन फलंदाजांना अडकवले. ३ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावांची खेळी केलेल्या महिपाल लोमरोर थिक्षणाचा बळी ठरला. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने फटकेबाजी केली. चेन्नईने प्रिटोरियसच्या या षटकात १६ धावा गमावल्या. २० षटकात बंगळुरुने ८ बाद १७३ धावा केल्या. थिक्षणाने २७ धावा देत ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक/कप्तान), रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, महीश थिक्षना.

रॉयल चॅलेंजर्सल बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!