🕒 1 min read
पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे याचं नाव आरोपापात्रातून वगळण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे आता संभाजी भिडे यांची भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या अडचणीतून मुक्तता झाली आहे, अशी चर्चा होत आहे. नुकतेच संभाजी भिडे हे सायकल वरून चक्कर येऊन पडले होते. उपचारातून ते बरे झाले आहेत. आता या बातमीमुळे त्यांची या प्रकरणातली अडचण दूर झाली आहे, अशी चर्चा होत आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांना क्लीनचीट मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा पोलिसांना मिळाला नाही. कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे संभाजी भिडे याचं नाव चार्जशीटमधून वगळण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचं पत्र पोलिसांनी मानवी हक्क आयोगाला दिलं आहे. संभाजी भिडेंना वगळून इतर ४१ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. या चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे आहेत. भीमा कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ ला हिंसा उसळली होती. त्या घटनेचे पडसाद नंतर महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
