Share

IPL 2022 SRH vs GT : हार्दिकच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातचं हैदराबादला १६३ धावांचं आव्हान!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०आयपीएल २०२२मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि सुसाट गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत आहे. डी. वाय. पाटीलवर रंगलेल्या या सामन्यात हैदराबादचा कप्तान केन विल्यमसनने टॉस जिंकत पहिली गोलंदाजी घेतली. कप्तान हार्दिक पंड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने हैदराबादला २० षटकात १६३ धावांचे आव्हान दिले.

गुजरातचा डाव

स्पर्धत चांगल्या फॉर्मात असणाऱ्या शुबमन गिलला आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. राहुलने शुबमनचा (७) भन्नाट एकहाती झेल घेतला. त्यानंतर मॅथ्यू वेड, साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर ठराविक अंतराने बाद होत राहिले. गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने दमदार फलंदाजी केली. तर तीन जीवदावन मिळालेल्या अभिनव मनोहरने ५ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावा जोडल्या. शेवटच्या षटकात हार्दिकला मोठी फटकेबाजी करता आली नाही. याच षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकने ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. २० षटकात गुजरातने ७ बाद १६२ धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर आणि नटराजनने प्रत्येकी २ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing XI

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन.

गुजरात टायटन्स – मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!