Share

IPL 2022 : फ्लाईंग राहुल त्रिपाठी..! गुजरातच्या फलंदाजाला ‘पॉवरफुल’ कॅचनं धाडलं माघारी; पाहा VIDEO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज आयपीएल २०२२मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात हैदराबादचा खेळाडू राहुल त्रिपाठीने अफलातून एकहाती झेल टिपला. त्याचा हा झेल पाहून सर्वजण थक्क झाले.

राहुलने गुजरात टायटन्सचा फलंदाज शुबमन गिलचा झेल घेतला. सामन्याचे तिसरे षटक भुवनेश्वर कुमार टाकत होता, या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शुबमनने कव्हरच्या दिशेने फटका खेळला. तिथे तैनात असलेल्या राहुलने आपल्या डाव्या बाजुला सूर मारत एका हाताने हा झेल घेतला. शुबमनला या सामन्यात ७ धावा करता आल्या.

या सामन्यात केन विल्यमसनच्या हैदराबादसमोर हार्दिक पंड्याच्या सुसाट गुजरातला रोखण्याचे आव्हान आहे. विल्यमसनने नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांची Playing XI

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन.

गुजरात टायटन्स – मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!