Share

…भाजपाच्या नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते हे अमित शाह यांनी स्पष्ट करावे- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल पुण्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करा, असे आव्हान त्यांनी काल भाषणात केले होते. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमित शाह काल पुण्यात आले आणि त्यांचे जे काही वक्तव्य आहे संपूर्ण असत्याला धरून आहे. कालच्या संपूर्ण भाषणामध्ये अमित शाह नक्की खरं काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या सरकारविषयी आणि आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करुन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या अडीच वर्षापासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तरीही जनता विश्वास ठेवायला तयार नाही हे वैफल्य आम्ही राज्यातल्या नेत्यांकडे असल्याचे पाहत आहे. पण आता त्यांचे सर्वोच्च नेतेसुद्धा त्याच वैफल्यातून महाराष्ट्रात येऊन बोलू लागले आहेत. हे पाहिल्यानंतर आम्हाला त्यांची दया येते आणि आश्चर्यही वाटते. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नाही आणि सोडणारही नाही. फक्त सत्तेसाठी आमच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला दूर करताना आणि सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी २०१४ साली शिवसेनेला दूर करा असे राज्यातला भाजपाच्या नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते हे अमित शाह यांनी स्पष्ट करावे असे आवाहन संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!