Share

‘… महाराष्ट्रात व देशात हे खपवून घेतलं जाणार नाही’, निलेश राणेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. एका प्रचार सभेमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी त्यांच्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना बॉलिवूडची अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली आहे. ‘माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. तुम्ही काय महाराष्ट्राला शिकवता?’, असे पाटील म्हणाले होते. दरम्यान, पाटलांच्या या टिकेवरूनच आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीका केली आहे.

‘जूलाब पाटील परत ओकला, म्हणे मतदारसंघाचे रस्ते हेमा मालिनीच्या गाला सारखे आहे. हा माणूस कधीच शुद्धीत नसतो तरी पण नशेत असो किंव्हा शुद्धीत असो महाराष्ट्रात व देशात हे खपवून घेतलं जाणार नाही.’ असे ट्वीट करत निलेश राणे यांनी शिवसेनेला गंभीर इशारा दिला आहे.

दरम्यान यावरच भाजपच्या चित्रा वाघ यांनीही संताप व्य्कीत केला आहे. ‘शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत, गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही. मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’ असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!