Share

‘भाजप इतर मंदिरे खुली करण्याबाबत बोलतंय मग, लोकशाहीचं मंदिर का बंद ठेवलंय’?

Published On: 

नवी दिल्ली : दिवाळीनंतर देशात कोरोनाचा संसर्गा पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. दिल्लीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्ये दिवसागणित वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतीविषयक कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी कॉंग्रेसने केली होती. मात्र आता सरकारने अधिवेशन स्थगित केल्याने नवा पेचप्रसंग उभा राहण्याची शक्यता आहे.

याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली आहे.ते म्हणाले,देशभरात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं मत मांडलं होतं. त्याचबरोबर संसद भवनाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे आता जानेवारी 2021 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.

आता केंद्र सरकारनं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केलं असून, त्यावरून मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. याच मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. कोरोना काळात राज्यात मंदिरे उघडण्याची भाषा करणाऱ्या भाजपने संसदेचे हिवाळी अधिवेशन का रद्द केले. लोकशाहीचे मंदिर का बंद केले आहे? अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

कोरोनाच्या नावाखाली संसदेचे हिवाळी अधिवेशन घ्यायचे नाही हे ढोंग आहे. भाजप सोयीनुसार लोकशाही, स्वातंत्र, आणिबाणीच्या वाख्या ठरवत आहे. राज्यात भाजपचे एक धोरण असते, देशात वेगळे असते . कोरोना हे जर संसदेचं हिवाळी अधिवेशन न घेण्याचं खरं कारण असेल. तर, बिहारची निवडणूक कशी झाली. बिहारमध्ये लाखोच्या सभा कशा झाल्या, बंगालमध्येही निवडणूकांसाठी जोरदार जमवाजमव सुरू आहे. एकीकडे राज्यातही मंदिरे उघडा, शाळा उघडा अमूक उघडा तमूक उघडा असे भाजपकडून केले गेले. मग त्यांनी हिवाळी अधिवेशन का रद्द केले.? असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

तर, संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यामागे खरं कारण शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. सरकारला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. भाजप इतर मंदिरे खुली करण्याबाबत बोलतंय मग, लोकशाहीचं मंदिर का बंद ठेवलंय. असा सवाल देखील संजय राऊत यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!