🕒 1 min read
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. फक्त निर्बंध लागू करून कोरोना नियंत्रणात येणार नसल्याने आरोग्य सेवेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. असे असूनही सध्याच्या लाटेत कोरोना प्रतिबंधक लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा यांचा देखील गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाफकिनला कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. मुख्यमंत्री ठाकरेंनी सुद्धा मोदींना याबाबत पत्र लिहून मान्यता देण्याची विनंती केली होती. आता महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या हाफकिन संस्थेला लस निर्मती करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. ‘१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की.’ असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की. @PMOIndia
— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2021
हाफकीनला भारत बायोटेकच्या मदतीने कोवॅक्सीन बनविण्यास परवानगी !
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास परवानगी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी काल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे.
सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरू करावे तसंच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.
- नागरिकांशी संवेदनशीलपणे वागा; गृहमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना
- कोहली-रोहितच्या पगारामध्ये वाढ नाही मात्र, हार्दिक पांड्याचे प्रमोशन
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सैनिकांची काय ही दशा? कुणाच्या पायावर कुणाचे डोके?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

