मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो आपली मतं मांडताना दिसतो. सेहवाग नेहमीच हटके पोस्ट आणि कमेंट्ससाठी ओळखला जातो. नुकतंच त्याने ख्रिस मॉरीसवर हटके कमेंट केली आहे. त्याची हि कमेंट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सेहवागनं मॉरीसच्या नाबाद 36 रनच्या खेळीवर लिहलं आहे.’पहिली मॅच – पैसा मिळाला, प्रतिष्ठा नाही. दुसरी मॅच – याला म्हणतात प्रतिष्ठा. प्रतिष्ठा आणि पैसा. कमाल केलीस मॉरीस’ असे ट्विट सेहवाने केले आहे.
आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात आखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारत दिल्ली कॅपीटल संघाचा ३ गडी राखुन पराभव केला. दिल्लीने कर्णधार पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले. दोन चेंडु बाकी असताना ७ गडी गमावुन राजस्थानने विजय साकारत गुणतालीकेत आपले खाते उघडले.
Pic 1 last match – Paisa mila par izzat nahi mili
Pic 2 today – Isse kehte hain Izzat.
Izzat bhi , Paisa bhi – Well done Chris Morris #RRvsDC pic.twitter.com/9hLqMk7OKT— Virender Sehwag (@virendersehwag) April 15, 2021
राजस्थान संघाची यावेळीही सुरुवात चांगली झाली नाही. तसेच मागील सामन्यातील हिरो कर्णधार संजु सॅमसन लवकर माघारी परतला. त्यानंतर मात्र मधल्या फळीतील डेव्हीड मिलरने ४३ चेंडुत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६२ धावांची खेळी करत विजय आवाक्यात आणला. तो बाद झाल्यानंतर अष्टपैलु खेळाडू ख्रिस मॉरीसने १८ चेंडुत ३६ धावांची वादळी खेळी करत राजस्थानच्या संघाला विजयी केले. या विजयासह राजस्थानने या सत्रातील आपला पहिला विजय मिळवला आहे.
आयपीएल इतिहासात सर्वात महाग ठरलेला खेळाडू मॉरिसने जबरदस्त खेळी करत सामना जिंकून दिला. दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेले १४८ धावांचे आव्हान राजस्थानने १९.४ षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
- नागरिकांशी संवेदनशीलपणे वागा; गृहमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना
- कोहली-रोहितच्या पगारामध्ये वाढ नाही मात्र, हार्दिक पांड्याचे प्रमोशन
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देऊन मदत करा; वडेट्टीवारांच मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

