🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड मधील परफेक्ट जोडीनं पैकी एक म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. अक्षय कुमार आणि ट्विंकलच्या नात्याला आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी जोड्या आहेत. त्यांच्यातील नात्याचं कायमच अनेकांना कौतुक असतं. त्यापैकीच एक म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना.
अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला तब्बल 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं अक्षयनं ट्विंकलसोबत एक सुरेख फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत एक तितकाच सुंदर संदेशही त्यानं लिहिला आहे.
अक्षयनं ट्विंकलसोबत घेतलेली एक सेल्फी शेअर करताना लिहिलं, की आपल्या पार्टनरशिपला आता 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला माहीत आहे, तू माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहेस. आपण एकदुसऱ्याला कधीच परिपूर्ण बनवत नाही. पण एकमेकांना सोबत करण्याचा मात्र पूर्ण प्रयत्न करतो. अक्षय पुढे लिहितो, की लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही तुला पाहून माझं हृदय तितक्याच वेगानं धडधडू लागतं. तू नेहमीच माझ्या काळजात राहतेस. लव यू टीना.’ अक्षयच्या या पोस्ट वरती अक्षयच्या चाहत्यांनी कंमेंट्सचा पाऊस पडला आहे.
https://www.instagram.com/p/CKIlIYQH3VG/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- ‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते-पाटील
- चंद्रकांत पाटील यांना धक्का; मूळ गावात शिवसेनेचा दणदणीत विजय
- नामांतर लढ्यातील योद्द्यांचा आठवलेंच्या हस्ते होणार सत्कार
- ‘बर्ड फ्लू’ची बाधा माणसांना होत नाही – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
- पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरे सत्राचा खेळ थांबवला; ऑस्ट्रेलियाकडे २७६ धावांची आघाडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
