रांची : अंमलबजावणी संचलनालयाच्या विविध पथकांकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. आज शुक्रवारी इडीने आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या खाणकाम आणि उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्या घरी, सरकारी निवासस्थानासह तसेच संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत.
पूजा सिंघल या झारखंडमधील वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. सध्या त्या खनिकर्म आणि उद्योग मंत्रालयाच्या सचिव म्हणून काम करत आहेत. पूजा सिंघल झारखंड राज्य खाण विकास महामंडळाच्या अध्यक्षा आहेत. भाजप सरकारच्या काळात त्या कृषी सचिव म्हणून काम करत होत्या.
ईडीनं मुंबई, दिल्ली, जयपूर आणि रांची सह २० ठिकाणी छापे टाकले. पूजा सिंघल यांच्याशी संबंधित ठिकाणांहून तब्बल १९.३१ कोटी रुपये जप्त केल्याची माहिती इडीने दिली आहे. ईडीनं पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांना अटक केली आहे. ईडीकडून या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. झारखंड, बिहार, राजस्थान, हरियाणा, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील मुंबईमध्ये ईडीनं एकाच वेळी छापे टाकले आहेत. रांचीमधील पंचवटी रेसिडेन्सी, ब्लॉक नंबर ९, चांदणी चौकातील हरिओम टॉवर, नवी बिल्डींग, लालपूर, पल्स हॉस्पिटल बरियातू आणि पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानी ईडीनं छापे टाकले.
महत्वाच्या बातम्या –


