Share

#पक्षांतर : स्वर्ग बदलण्याची स्पर्धा लोकशाहीचा नरक करील – संजय राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांविषयी सामनाच्या रोखठोक मधून भाष्य केले आहे. त्यांनी ‘महाराष्ट्रात आणि देशात पक्षांतराची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष उरेल काय, हा प्रश्न आता पडतो. काँग्रेस व राष्ट्रवादी हा ज्यांच्यासाठी कालपर्यंत स्वर्ग होता ते सगळे नव्या स्वर्गाच्या दारात रांग लावून उभे आहेत. स्वर्ग बदलण्याची स्पर्धा लोकशाहीचा नरक करील’ असं विधान केले आहे.

पुढे बोलताना राऊत यांनी सध्या जो उठतोय तो भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेत जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी राजकारणात अस्पृश्य ठरलेले हे पक्ष. आज या दोन्ही पक्षांच्या बाहेर लोक रांगा लावून उभे आहेत. जे रांगेत आहेत यापैकी काही लोकांनी अनेकदा पक्ष सोडला आहे. त्यामुळे आजचे आयाराम हे उद्या गयाराम होणार नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नाही असं म्हटले आहे.

छगन भुजबळ यांच्या प्रवेशावर भाष्य करताना यांनाही शिवसेनेत यावे असे वाटत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. भुजबळ यांनी हे सर्व खोटे असल्याचे सांगितले व पुण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीस जाऊन बसले. तीस वर्षांपूर्वी शिवसेना सोडणार नाही असेच ते शेवटपर्यंत सांगत होते. सध्याच्या राजकारणात चरित्र नावाची गोष्ट उरली नाही व चारित्र्यहनन हे मोठे हत्यार झाले. त्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा सर्वच स्तरांवर वापरली जाते असं विधान राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधून अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात वैभव पिचड, उदयनराजे भोसले, पद्मसिंह पाटील, जयकुमार गोरे, राधाकृष्ण विखे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे, त्यावर राऊत यांनी भाष्य केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!