Share

रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Published On: 

मुंबई : मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी शिवसेना नेते रामदास कदम(Ramdas Kadam) यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपविषयी भाष्य केले आहे.

यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’सुनिल शिंदे(Sunil Shinde) हे कडवट शिवसैनिक आहेत. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते आहेत. तेही कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून पक्षाचं नेतृत्व केलं. सुनिल शिंदे वरळीचे आमदार होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी ती जागा सोडली. हा त्यांचा त्याग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या त्या त्यागाचं निष्ठेचं स्मरण ठेवलं आणि त्यांना आमदार म्हणून विधान परिषदेवर आणण्यासाठी उमेदवारी दिली.’

दरम्यान, पुढे ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने रामदास कदम यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी त्यावर बोलणं टाळलं. ते म्हणाले की,’रामदास कदम यांनी पक्षासाठी अनेक वर्षे काम केलंय. ते अनेक वर्षे आमदार होते, अनेक वर्षे मंत्री होते. विधान परिषदेत देखील त्यांनी पक्षाचं नेतृत्व केलंय.’ तसेच ते आमचे सहकारी आहेत आणि आम्ही एकत्र काम करू, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!