Share

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही राजकीय अपरिहार्यता – संजय राऊत

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा धाव घेतली. परमबीर सिंगी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या याचिकेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. यावरून आता महाविकास आघाडी सरकार कमालीचे अडचणीत आले आहे. सरकार अडचणीत आल्यावर शिवसेनेचे नेते आणि राज्यात सरकार स्थापन करण्यात महत्वाचा वाटा असणारे संजय राऊत नेहमीच सरकारचा बचाव करण्यासाठी पुढे असतात. मात्र आता एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक विधान केले आहे.

महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत भाष्य करणारी मुलाखत संजय राऊत यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे. त्या मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही राजकीय अपरिहार्यता आहे. हे भाजपामुळे घडले आहे. हे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहे. मात्र आम्ही हिंदुत्वासोबत कुठलीही तडजोड केलेली नाही. तसेच आमचा हिंदुत्वाचा अजेंडाही बदललेला नाही, असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेना परमबीर सिंग यांचं कौतुक करायची मात्र आता दोघेही आमने-सामने का आले आहेत, असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांच्यावर सुशांत आणि कंगना प्रकरणामध्ये भाजपाने विश्वास ठेवला नव्हता. मात्र आता त्यांच्याच एका पत्राच्या बाजूने भाजपा गोंधळ घालत आहे. महाराष्ट्रात मोठे पोलीस दल आहे. यामध्ये एक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टरसाख्या छोट्या पदावरील व्यक्ती कसा काय मोहरा, असू शकतो असे सांगत राऊत यांनी फडणवीसांचा दावा फेटाळून लावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!